डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘हायड्रोजन जनरेटर’ चे यशस्वी संशोधन

तळसंदे : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे नव्याने उभारलेल्या रिसर्च सेन्टरच्यावतीने ग्रीन हायड्रोजन जनरेटरचे यशस्वी संशोधन करण्यात आले आहे.

या सेंटरचे संशोधक प्राध्यापक आरिफ शेख यानी 100% ग्रीन हायड्रोजन जनरेटर युनिटचे संशोधन व निर्मीती केली आहे. केंद्र सरकारच्या हरित उर्जा धोरणाच्या ( मिशन ग्रीन हायड्रोजन) दृष्टीने हे संशोधन महत्वपूर्ण ठरणारा आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशा ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन वीजनिर्मिती प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या उपक्रमाद्वारे २०३० पर्यंत ५ दश लक्ष मेट्रिक टन स्वच्छ हायड्रोजन इंधन उत्पादन करण्याचा उद्देश आहे. या मिशनसाठी उपयुक्त असे युनिट डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाने केले आहे.

हे युनिट स्वयंचलित असून संपूर्णतः सोलर एनर्जीवर कार्य करणार आहे. भारतात सध्या हायड्रोजन तयार करण्यासाठी दोन प्रकारचे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाते.पहिल्या तंत्रज्ञानात पाण्याच्या इलेक्ट्रोलिसीसपासून हायड्रोजन वायूची निर्मीती केली जाते. यात पाण्यापासून हायड्रोजन वेगळा केला जातो. दुसऱ्या तंत्रज्ञानात नैसर्गिक वायूतुन हायड्रोजन अलग केले जाते. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाने संशोधित केलेल्या युनिटमध्ये पहिल्या तंत्रज्ञानावर आधारित अचूक संशोधनाअंती दोन वेगवेगळ्या हायड्रोजन सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊर्जा निर्मिती होत असताना अवशेष म्हणून निव्वळ पाणी शिल्लक राहील.

या प्रक्रियेदरम्यान धूर निघण्याची अजिबात शक्यता नाही. या युनिटचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हायड्रोजन वायु निर्माण करण्यासाठी औष्णिक ऊर्जा, सौर व पवन ऊर्जेचा वापर केला जावू शकतो. कमीत कमी खर्चामध्ये वीजनिर्मितीसाठी तसेच कार आणि मोठया गाड्यामध्ये व्हावा हा या संशोधनामागील प्रमुख उद्देश असल्याचे शेख यांनी सांगितले. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

सदर संशोधन उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील , उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर, डीन प्रा.आर. एस. पवार व प्रा. एच. एस नायकवडी यांचे सहकार्य लाभलेचौकट करणे*‘ड्राय सेल’ची निर्मिती* या हायड्रोजन जनरेटरमध्ये पेटंट टेबल ड्राय सेलची निर्मिती करण्यात आली आहे. हा ड्राय सेल एसी किंवा डीसी सप्लायवर कार्यान्वित होतो. यात 100 % स्वयंचलित स्मार्ट रेग्युलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. टू स्ट्रोक ,फोर स्ट्रोक इंजिनच्या क्षमतेनुसार जनरेटरमध्ये हायड्रोजनची निर्मिती होती. जितकी गरज आहे, तेवढेच हायड्रोजनची निर्मिती होते. या माध्यमातून हरित उर्जा उपलब्ध होत असल्याचे प्रा. आरिफ शेख यांनी सांगितले.

🤙 8080365706