उद्या शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा…..

मुंबई: देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात  प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी 26 जानेवारीला मोठी परेड होत असते. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच या परिसरात कसून चौकशी केली जात आहे.आज सकाळपासूनच परेडची तयारी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

🤙 8080365706