डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या वैष्णवीची दिल्लीतील प्रजासत्ताक रॅलीसाठी निवड

कोल्हापूर : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्र सेनेची छात्रा, ज्युनिअर अंडर ऑफिसर वैष्णवी प्रकाश साळोखे हिची दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली आहे.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या प्रधानमंत्री रॅली आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होणार आहे. महाविद्यालयात 2022-23 वर्षांपासून NCC युनिट सुरू झाले आहे.

पहिल्याच वर्षी या युनीटची छात्रा वैष्णवी हिची थेट राष्ट्रीय पातळीवरील रॅलीसाठी निवड झाली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल वैष्णवीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए.के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ संतोष चेडे व रजिस्ट्रार डॉ एल. व्ही. मालदे यांचे प्रोत्साहन लाभले. डीन स्टूडेंट अफेअर डॉ. राजेंद्र रायकर आणि एन. सी. सी. समन्वयक डॉ. राहुल महाजन यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

🤙 8080365706