
साळवण :गगनबावडा जवळील वन विभागाच्या कार्यालय जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गगनबावडाच्या वनविभागाच्या चेक नाका जवळून प्रमुख रस्ता ओलांडून पाटबंधारे कार्यालय वन विभागाच्या हद्दीत बिबट्या गेला असल्याचे रहिवाशी प्रवीण सरनोबत व वनरक्षक संग्राम पाटील यांनी सांगितले . सायंकाळी सहाच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे . ग्रामीण रुग्णालयसमाज कल्याण विभागाची निवासी शाळा याच परिसरात आहे . त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .खबरदारीचा उपाय म्हणून रात्री अपरात्री विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन गगनबावडा वन विभाग व ग्रामपंचायत यांनी केले आहे.
