कोल्हापूर ‘मनपा’ चे मुख्य आरोग्य निरीक्षक निलंबित

कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाकरिता कार्यरत असलेल्या टिपर रिक्षांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केल्याचे निदर्शनास येताच मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत देवराव पवार यांना महापालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले, तसेच त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे जयवंत देवराव पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक यापदी कार्यरत असून, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेच्या अनुुषंगाने कामकाज करणे त्यांचे कर्तव्य होते; परंतु त्यांच्याकडून कर्तव्यात वारंवार दुर्लक्ष होत होते, तसेच कामकाजाकरिता कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय कार्यवाहीला विलंब करीत असत, तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता हलगर्जीपणा करीत होते, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.महापालिकेच्या १०४ ऑटो टिपर वाहनांची वित्तीय नियतीचा अवलंब न करता ८७.५९ लाखाची लायबलिटी मनपावर टाकल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यांनी मंजूर रकमेपेक्षा अतिरिक्त खर्च केला होता. त्यास वरिष्ठांची मंजुरीही घेतली नाही, तसेच त्यांच्या निदर्शनासही ही गोष्ट आणून दिली नाही. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

🤙 8080365706