भाज्यांचे दर कडाडले…..

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे गाजराच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भेंडी नंबर १ प्रति किलो ५५ रुपये ते ६० रुपये किलो तर फरसबी प्रति १ किलो प्रमाणे, २९ रुपये ते ३२ रुपये इतकी आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६००० रुपये. भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये आहे.

🤙 9921334545