
दिल्ली : जागतिक बाजारपेठेमध्ये आज सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाल्याचं दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढला आहे. आजचा सोन्याचा दर (फेब्रुवारी वायदा) 56 हजार 696 इतका आहे. आजचा सोन्याचा सर्वोच्च दर हा 56 हजार 746 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे.

एमसीएक्स चांदीचा दर (मार्च वायदा) 371 रुपयांनी वाढला. चांदीचा आजचा दर 68 हजार 730 रुपये इतका आहे. गुरुवारी एमसीएक्स सोन्याचा दर 56 हजार 546 रुपयांवर असताना व्यवहार थांबले होते. तर एमसीएक्स चांदीचा दर 68 हजार 359 हजार इतका होता.जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली. हाजिरा सोन्यात 20.80 डॉलरची वाढ झाली. प्रति औंस (एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम) 1 हजार 927.81 डॉलर इतका आहे. तर हाजिर चांदीचा दर 0.37 डॉलरच्या वृद्धीसहीत 23.87 डॉलर प्रति औंस इतका आहे.