
किचनमध्ये जास्त डबे घाण होतात. डबे घासताना तासंतास त्यातच मोडतो पण तुम्ही डबे घासण्यासाठी उरलेल्या चहापत्तीचा वापर करून डब्ब्यांवरील चिकटपणा सहज काढू शकता.

यासह काचेच्या भांड्यांना देखील नवी चमक देऊ शकता.
सर्वप्रथम, उरलेल्या चहापत्तीला पुन्हा एकदा उकळून घ्या. आता या चहाच्या तयार पाण्यात लिक्विड डिशवॉशर टाका. आपण या तयार डिशवॉशरने डबे घासून काढू शकता. याने डब्ब्यांवरील चिकटपणा दूर होईल. यासह ते नव्यासारखे दिसतील. या पाण्याने आपण इतर भांडे देखील घासू शकता.काचेची भांडी दीर्घकाळ ट्रोलीच्या आत राहिल्यामुळे चिकट होतात. काचेची भांडी घासताना मनात भीती निर्माण होते की, भांडी आपल्या हातून फुटणार तर नाही ना? मात्र, आपण काचेची भांडी सोप्या पद्धतीने झटपट घासून काढू शकता. उरलेल्या चहापत्तीला पुन्हा उकळून घ्या. त्या पाण्यात लिक्विड डिशवॉशर टाका. आणि त्या पाण्यात काचेची भांडी घासून घ्या. याने काचेची भांडी चकचकीत निघतील.
