विधवा अनिष्ठ‌ रूढीना फाटा देऊन अंत्यविधी

बालिंगा / मोहन कांबळे

काटेभोगाव (ता. पन्हाळा) : तातोबा आबा कांबळे (राजे) यांचे नुकतेच वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. या वेळी त्यांचे उच्चविद्याविभूषित कुटुंबानी फरंपरेला फाटा देवून मनीमंगळसूत्र तोडून त्यातील सोन्याचा मनी मृत नवऱ्याच्या दाढेत ठेवणे, बांगडया फोडणे‌ या अनिष्ट रुढींना फाटा देवून मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्यात आले.

एवढ्यावरच हे कुटुंबीय थांबले नाहीत , तर त्यांनी बाराव्याचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी घेतला. या दिवशीच्या जलदान विधीवेळी परंपरागत रुढींना फाटा देत त्यांची पत्नी बायनाबाईंना हिरवी साडी (नऊवारी पातळ) आणले. पुरोगामित्व जपणाऱ्या या माऊलीने सहजतेने या निर्णयाला सहमती देत हिरवी साडी नेसून कुंकू , मंगळसुत्रासह जलदान विधीत व त्यानंतर पुण्यानुमोदन शोकसभेत सहभाग नोंदवला.

पतीच्या निधनाचे अतीव दु:ख बाजूला ठेवून त्यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला. शोकसभेत भावना व्यक्त करणाऱ्या अनेक नातलगांनी या निर्णयाचे कौतुक केले. विधवांना सन्मान मिळवून देण्यासाठी गतवर्षी अनेक गावात ग्रामपंचायतींच्यावतीने विधवांचा साडी चोळी देवून सत्कार करणे, मंगळसूत्र, कुंकू असे सौभाग्य अलंकार वापरण्यास प्रोत्साहन देणे अशी योजना राबविण्यास सुरवात झाली होती. पण ती अल्पजीवी ठरल्याचे सध्याचे चित्र आहे. बायनाबाईंच्या या निर्णयाने सदर योजनेचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल.

🤙 8080365706