
कोल्हापूर : धन्वंतरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉक्टर गुणाजी नलावडे यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टर नलावडे यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एम. इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.चेअरमन पदी निवड झाल्यानंतर नलवडे बोलताना म्हणाले सर्वांना बरोबर घेऊन संस्थेच्या आणि सभासदांच्या हितासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेच्या माजी चेअरमन श्रीमती संगीता गुरव, व्हाईस चेअरमन संदीप नाईक, संचालक डॉक्टर प्रशांत कोरे, डॉक्टर मिलिंद कदम महेश देशमुख, विनायक काटकर, विलास आळवेकर श्रीमती पुष्पलता बर्गे , श्रीमती संध्या महाजन तज्ञ संचालक संभाजी माने डॉक्टर फारूक देसाई आणि सुकाणू समिती सदस्य तसेच कुमार कांबळे , आर एस पाटील, शरद देसाई, श्रीकृष्ण बांदिवडीकर , सुनील पाटील , मंगल पाटील, विश्वनाथ परमने, डॉक्टर संदीप मिरजकर यांचे चेअरमन निवडीसाठी सहकार्य लाभले. मावळत्या चेअरमन श्रीमती संगीता गुरव यांनी चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये संस्थेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले याप्रसंगी सर्व संचालक मंडळाचे व सुकाणू समितीचे सहकार्य लाभले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच नूतन चेअरमन डॉक्टर गुणाजी नलवडे यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, स्वाभिमानी आरोग्य सेवक संघटना, विस्ताराधिकारी संघटनाचे प्रतिनिधी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. तर संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सुभाषजी इंदुलकर शुभेच्छा देण्यासाठी साठी उपस्थित होते.
