जे.पी. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा काळ वाढवला; गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा

दिल्ली : जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा काही वेळापूर्वीच केली.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ दुसऱ्या कुणाच्या गळ्यात पडणार का? याची चर्चा सुरू होती. मात्र तसं घडलेलं नाही. जे. नड्डा हे जून २०२४ पर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत.

🤙 8080365706