क्षेत्र प्रयाग येथील स्नान पर्वकाळ रविवारपासून…

क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिर संगम परिसर व दत्तमूर्ती

शहाजी पाटील प्रयाग चिखलली

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील श्री क्षेत्र “प्रयाग”येथील पंचगंगेच्या मूळ संगमावरील स्नान पर्वकाळास रविवार दिनांक 15 जानेवारी सकाळी सात वाजलेपासून (मकर संक्राती योगावर) सुरुवात होत आहे.

त्यानिमित्त कोल्हापूरच्या पश्चिमेस अवघ्या पाच किलोमीटरवर वसलेल्या श्री क्षेत्र “प्रयाग” येथे पंचगंगेचे मूळ संगम ठिकाण आहे. याठिकाणी कुंभी कासारी भोगावती तुळशी व सरस्वती या पाच नद्यांचा संगम झाल्याचे संदर्भ आहेत. दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना या ठिकाणी स्नान व दर्शनाचा महापुण्यपर्वकाळ सुरू होतो. हा स्नान पु्यपर्वकाळ पुढे एक महिना राहतो क्षेत्र प्रयाग या स्थानाला करवीर काशी दक्षिण काशी या नावानेही संबोधले जाते या तीर्थस्थानाच्या पावन ते बद्दल अनेक आख्यायिका आहेत . प्राचीन काळे दक्षिण क्षेत्राचा उद्धार करण्यासाठी अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा यांनी प्रयाग ठिकाणी येऊन वास्तव्य केल्याचे संदर्भ करवीर काशी ग्रंथांमध्ये आले आहेत. महालक्ष्मीच्या वास्तव्यामुळे उत्तर काशी पेक्षा दक्षिण काशी क्षेत्र विशेष पावन असल्याचे संदर्भ अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आले आहेत. क्षेत्र दक्षिण प्रयाग या ठिकाणी मुक्ती बरोबरच सुख समृद्धी प्राप्त होते असेही भाविकातून मानले जाते त्याच भावनेतून क्षेत्र प्रयाग येथे मकर संक्रांति पासून सुरु होणाऱ्या स्नान पर्व काळासाठी भाविकांची गर्दी होत असते या महिन्याभरात या ठिकाणी कोल्हापूर परिसर सांगली सातारा पुणे आदी भागातून येणारे भाविक स्नान व दर्शनाचा लाभ घेतात. दरम्यान या ठिकाणी एक महिनाभर प्रयाग यात्रा भरते चालू वर्षी हा स्नान पर्व का 15 जानेवारी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटापासून सुरू होत आहे.महापुण्यपूर्व काळाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे चालू वर्षीही या ठिकाणी रविवारी 15 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता दत्तात्रयांची पालखी निघणार आहे पालखीतील मूर्तीला संगमावरील स्नान घालण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी दत्तात्रयांना महा अभिषेक आरती पालखी मिरवणूक पूजा बांधणे भजन असे आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे पुजारी यशवंत गिरी गोसावी यांनी सांगून भाविकांनी स्नान व दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पुण्य मिळवण्याबरोबरच दोष मुक्त व्हावे असे आवाहन केले आहे.क्षेत्र प्रयाग येथे स्नानपर्व काळामध्ये भाविक तसेच पर्यटक महिनाभर गर्दी करत असतात त्यानिमित्ताने चालू वर्षी हे या ठिकाणी महिनाभर यात्रा भरणार आहे यात्रेमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीचे विविध स्टॉल लागलेले आहेत

जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षा

मकर संक्रांति पासून पुढे एक महिनाभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम प्रसाद पालखी मिरवणूक भजन प्रवचन कीर्तन असे भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत येथील पुजारी मार्फत भाविकांची सोय होईल अशी यंत्रणा कार्यरत आहे मात्र भाविकांची गर्दी मोठी असल्यामुळे पुजाऱ्यांच्या सेवेला काही मर्यादा येतात त्यामुळे शासकीय पातळीवर ही या ठिकाणी स्वच्छ पाणी आरोग्यसेवा फिरती टॉयलेट बाथरूम, पार्किंग शिस्त, दिशादर्शक फलक, महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी ची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापकांचे पथक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाविकातून होत आहे. यात्रा काळात कोल्हापूर पासून प्रयाग पर्यंत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते मात्र सुरक्षित प्रवास यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडून पुरवणे अत्यंत गरजेचे आहे तसेच पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी बंदोबस्त ठेवून भाविकांची सोय लावणे आवश्यक आहे.