महाराष्ट्रमध्ये नंगानाच खपवून घेतला जाणार नाही ; चित्रा वाघ यांचा उर्फीवर हल्ला बोल

मुंबई : सोशल मीडियावर उर्फीनं आतापर्यत चित्रा वाघ यांच्या आरोपांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. त्याची जोरदार चर्चाही आहे. त्यामुळे वाघ यांनी काहीही झालं तरी उर्फीनं यापुढे सामाजिक ठिकाणी वावरताना आपल्या पेहरावाचे भान ठेवावे याकडे लक्ष वेधले आहे. मी माझ्या मुद्दयावर ठाम असून महाराष्ट्रामध्ये नंगानाच खपवून घेणार नाही. असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीवर हल्लाबोल केला आहे. आपली भूमिका कुण्या एका व्यक्तीविरोधात नसून समाजामध्ये कपड्यांवरुन ज्याप्रकारे गोष्टी होतात त्याबाबत आहे. त्यात उर्फीनं भान ठेवत वागण्याची गरज आहे. तिच्याविरोधात महिला आयोगानं दखल घ्यावी असे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे.दुसरीकडे आयोगानं उर्फीला बोलावून घेतले होते. उर्फी आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली होती. यावेळी तिनं रुपाली चाकणकर यांची भेटही घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या कपड्यांवरुन तिला वेगवेगळ्या कमेंटसही मिळाल्या आहेत. त्यात तिचे टी शर्ट, गॉगल यावरुन ती ट्रोल होताना दिसते आहे.उर्फीनं यावेळी वाघ यांच्याविरोधात आयोगाकडे तक्रार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.एरवी अजीबोरगरीब फॅशन करणारी उर्फी एवढ्या साध्या कपड्यात आली कशी असा प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. उर्फीन अजुन महिला आयोगाकडे लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

🤙 8080365706