गुहागर मतदारसंघाचा आमदार हा शिंदे गटाचाच असेल; रामदास कदम

खेड (जि. रत्नागिरी) : कोणी कितीही वल्गना केल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघाचा आमदार हा शिंदे गटाचाच असेल.त्याची जबाबदारी मी घेतली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री तथा शिंदे गटाचे कोकणातील नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना आव्हान दिले.

नांदगाव येथील मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पालकमंत्री अनिल परब तसेच गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली. याच मेळाव्यात त्यांनी भास्कर जाधव यांना निवडून येण्याचे आव्हान दिले.शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर आज (ता. १३ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा पहिलाच मेळावा खेड तालुक्यातील परंतु गुहागर मतदार संघातील नांदगाव येथे झाला. याच मेळाव्यात कदम यांनी ॲड. अनिल परब आणि भास्कर जाधव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.

🤙 8080365706