
मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली असून मालिका, नाटक, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून मनोरंजन करणारा अभिनेता सुनिल होळकर यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी केलेले ‘मोरया’ चित्रपटामधील काम आणि ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतील भूमिका आज देखील प्रेक्षकांच्या मनात आहेत. सुनिल होळकर लिव्हर सोरायसिस या दुर्धर आजाराने गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. अनेक उपचार करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. हा आजार असा आहे ज्यामध्ये कधीही शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुरुवारी (दि. १२) पर्यंत ते ठीक होते, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मूल असा परिवार आहे.
