जगाला वाचवणारा “पंचभौतिक महोत्सव” ; 20 ते 26 फेब्रुवारीला कणेरी मठावर येणार सुमारे 30 लाख नागरिक

प्रकाश कारंडे / प्रतिनिधी

कोल्हापूर : अध्यात्माला विज्ञानाची जोड देत आपली संस्कृती आणि परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने कणेरी मठ तालुका करवीर येथे 20 ते 26 फेब्रुवारी या दरम्यान पंचभौतिक पंचभौतिक महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.

परिषद प्रदर्शन, आणि परिवर्तन या त्रिसूत्रीच्या आधारे देश विदेशातील तज्ञानसह भारत देशातील सुमारे 30 लाख नागरिकांना पर्यावरण आणि त्याचा होणारा ऱ्हास व त्याचा मानवी जीवनावरील परिणाम तसेच उपाय पटवून देण्यासाठीच या महोत्सवाची निर्मिती करण्यात आली आहे .मानवाची निर्मिती आणि आणि मानवाचे जीवन समृद्ध करणाऱ्या पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांचे महत्त्व पटवून देऊन जगाचा नाश वाचवण्यासाठीच या महोत्सवाची निर्मिती आहे.या सर्वामुळे कोल्हापूरचे नाव मात्र जगाच्या नकाशावर येणार आहे या महोत्सवासाठी लागणारी पार्किंग सह पाचशे एकर जागा कनेरी मठाकडे उपलब्ध आहे. पृथ्वी अग्नी वायू आकाश आणि जल हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्यासाठी आठ एकर ची गॅलरी उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

पृथ्वीचे दोन भाग करून तळापासून वरपर्यंत पृथ्वी मध्ये काय काय आहे हे दाखवण्यासाठी महाकाय पृथ्वीची उभारणी सुरू आहे .पृथ्वीवरील मातीची पोषकता सुपीकता सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी झाले कणांची रचना बदलल्याने तसेच कोणत्या रसायन, पेस्टिसाइड्स मुळे जमीन विषारी बनली यावरचे सर्व उपाय कृतीतून दाखवले जाणार आहेत.अग्नीचा चुकीचा वापर आणि त्याचा पृथ्वीवरील परिणाम, अणुऊर्जा, गॅस, डिझेल, पेट्रोल, सोलर, इथेनॉल ,हायड्रोजन यांचा जन्मापासून मरेपर्यंत एक माणूस किती वापर करतो हे देखील दाखवले जाणार आहे. प्रत्येक गावात ऊर्जा कशी तयार होईल यावर फोकस आहे .वायु तयार होण्यापासून त्यातले बिघाड, कमी दाबाचे पट्टे ,चक्रीवादळ, सुनामी याचा परिणाम औद्योगिकआणि विमान, सॅटेलाईट यामुळे हवेचे बिघडलेले (वाढलेले )तापमान आणि त्यामुळे वितळणारा बर्फ या सर्वाचा ओझोन वायू वर झालेला परिणाम याचबरोबर जलरक्षणासाठी भारतीय संस्कृतीत कोणते उत्सव आहेत आज पाण्याचा स्तर 800 फुटावर गेला आहे कोणत्या हंगामात कोणत्या भांड्यात पाणी साठवावे आणि पाण्याचा माती वारे पृथ्वीवर कसा परिणाम होतो हे देखील कृतीतून दाखवले जाणार आहे .मुळात या सर्व पंचतंतवात स्वातंत्र्यानंतर काय बिघाड झाला आणि त्याचा पृथ्वीवरील सर्वच जीवावर कोणता परिणाम होणार याचा प्रत्येक व्यक्तीने विचार करावा यासाठीच या महोत्सवाची निर्मिती आहे याचबरोबर ज्ञान विज्ञान संस्कार पर्यावरण संस्कृती मूल्यांचा पाठपुरावा करता यावा तसेच ज्यांना वैज्ञानिक माहिती नाही आणि ज्यांना पारंपारिक माहिती नाही अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना यातून खूप ज्ञान मिळेल कारण या सर्वावर आधारित 1000 स्टॉलची उभारणी या ठिकाणी होणार आहे याच ठिकाणी देशातील सर्व प्रकारचे बियाण्याचे वाण आपल्याला पाहायला मिळणार आहेत कमी शेती असणाऱ्यांसाठी देशभरातून छोटी छोटी यंत्र यांचे प्रदर्शन ही भरणार आहे घरच्या घरी लागणारी आवश्यक यंत्रसामग्री याच्या कुटीर उद्योगाचे ही प्रदर्शनी यावेळी भरणार आहे आयुर्वेद आणि उपचार यासाठी देखील स्वतंत्र गॅलरीचे नियोजन करण्यात आले आहे या महोत्सवासाठी कोल्हापूर सह महाराष्ट्र गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश मधील लाखो नागरिक येणार आहेत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान 200 नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे याशिवाय परदेशातील 40 ते 50 देशांचे प्रतिनिधी या महोत्सवात सामील होतील आजच्या परिस्थितीत काय आहे आणि आपल्या पूर्वजांनी पृथ्वी अग्नी वायू जल आकाश या पंचभूतांचा सांभाळ कसा केला हे देखील या महोत्सवातून समजणार आहे महोत्सवाची माहिती येणाऱ्या प्रत्येकाला समजावे म्हणून डॉक्टर हळदवडेकर आणि त्यांची टीम विशेष परिश्रम घेताना दिसत आहे आत्तापर्यंत मागील उत्सवांचा विचार करता हा देखील उत्सव यशस्वी होणार यात शंका नाही मठ ही सार्वजनिक संपत्ती असून आम्ही व्यवस्थापक आहोत जर मजुरी करणाऱ्या सह सर्व स्तरातील लोक प्रेमाने एवढे मोठे संस्थान चालवतात तर शेतीसह निरोगी समाज कसा राहील त्यांचे भले कसे होईल या संकल्पनेतून समाजाकडून मिळालेले समाजाला दुपटीने तिपटीने देण्याचा आमचा संकल्प आहे यासाठी आम्हाला कोणत्याही बॉर्डरची आवश्यकता नाही अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामीजी कनेरी मठ यांनी सांगितले. वर्षभराची भाजी दोन किलो मातीत वाढती लोकसंख्या आणि जमिनीची नापिकता याचा विचार करता कमीत कमी दोन किलो माती आणि एक लिटर पाणी यामध्ये किती धान्य पिकवू शकतो शिवाय दुधी भोपळ्याचा एक वेल 1000 दुधी भोपळे कशा पद्धतीने देईल याचे प्रात्यक्षिक या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. ग्राम वैद्यांचे राष्ट्रीय अधिवेशन ज्या वैद्यांच्या कडे कोणतीही डिग्री नाही ते सिरीयस पेशंट बघत नाहीत परंतु त्यांच्याकडे चांगली उपचार पद्धती आहे अशा देशातील ग्रामवाद्यांचे राष्ट्रीय अधिवेशन याच महोत्सवात तीन दिवसांसाठी होणार आहे या उपचार पद्धतीचे डॉक्युमेंटेशन होऊन त्यावर रिसर्च होणे गरजेचे आहे यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.