डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना डॉ. लीतेश मालदे, योगेश चौगुले, आर. एस. बेन्नी, विराज पसारे, मकरंद काईंगडे यांच्यासह विद्यार्थी.

कसबा बावडा/वार्ताहर

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे येथे मंगळवारी(3 जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिक्षण हेच स्त्रीच्या प्रगतीचे मध्यम आहे हे ओळखून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी घराबाहेर पाउल टाकले.

आजच्या आधुनिक स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची ही सुरुवात म्हणावी लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून महिलाना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे, समाजात त्यांचे महत्वपूर्ण स्थान निर्माण करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले आहे. त्यांनी पेरलेल्या बियांची चांगली फळे आज आपण पाहत आहोत. महिलांचा सन्मान राखणे हे आपले सर्वाचे कर्तव्य असून आज त्यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा अवमान होणारे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही असा निश्चय करुया असे आवाहन डॉ. मुदगल यांनी यावेळी केले. यावेळी सरिता चौधरी, तेजस्विनी हतकर,श्रिया पाटील यांनी सावित्रीबाईच्या कार्यबद्दल विचार मांडून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी कुलसचिव व्ही. व्ही. भोसले, डीन डॉ. आर. के. शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव, डॉ. अंजली वाघ, डॉ. अर्चना ढवळशंख, डॉ. सुनिता पाटील प्रा. अर्पिता तिवारी, हेमा सासने यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल बी. एस. पाटील, हेमा सासने कार्यक्रमाचे नियोजन केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये सावित्रीबाई जयंतीडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे मंगळवारी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डॉ. राजेंद्र रायकर, एनएसएसचे समन्वयक योगेश चौगुले, प्रा. आर. एस. बेन्नी, विराज पसारे, तुषार आळवेकर यांच्यासह विद्यार्थी समन्वयक प्रथमेश आरगे, सुमित कांबळे, वैष्णवी पानवळ, स्वप्निल माने यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

🤙 9921334545