
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पण, या घटनेच्या वेळीत मृत तरुणीसोबत तिची मैत्रिण सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दारूच्या नशेत एका टोळक्याने बलोनो कारने तरुणीच्य स्कुटीला धडक दिली. धडक दिल्यानंतर तरुणीला 10 किमी फरफटत नेलं.10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे.ज्यावेळी मृत तरुणी अंजलीचा अपघात झाला त्यावेळी तिच्यासोबत आणखी एक तरुणी होती. एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. मृत तरुणी आणि तिची मैत्रिण सोबतच जर ती या तरुणीसोबत होती आणि तिला इजा झाली असेल तर तिने याबद्दल पोलिसांना का सांगितले नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली.दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याचंस समोर आलं. 10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दिल्ली पोलिसांनी पाचही आरोपी युवकांना अटक केली आहे.