नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ….

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ५०,३५० रुपये वरून ५०,६०० झाली आहे.

चांदी ७१,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५०,६०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,२०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,२०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,२३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७१३ रुपये आहे.

🤙 8080365706