श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध; वार्षिक स्नेहसंमेलनास अलोट गर्दी..

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाहू कारखान्याच्या अध्यक्षा अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते झाले.

कागल : येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिरच्या चिमूरड्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांच्या कलाविष्काराने खचाखच भरलेले शाळेचे प्रांगण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या शाळेचे स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे (आईसाहेब) उपस्थित होत्या.

या कलाविष्काराचा मनमुराद आस्वाद लुटण्यासाठी अबालवृद्धांसह पालक, हितचिंतक यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा कार्यक्रम घेतलेला नव्हता. यंदा या कार्यक्रमाचे शाळेने केलेल्या नेटक्या नियोजनाचे मान्यवरांसह उपस्थितांनीही कौतुक केले .कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण यांनी केले. विद्येची आराध्य देवता श्री. गणेशाला वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

स्नेहसंमेलनाचे निमित्ताने मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

गवळण,भारूड,पथनाट्य,कोळी गीत , लावणी अशा विविधरंगी सादरीकरणातून महाराष्ट्राची विविधतेने नटलेली हुबेहूब संस्कृतीच या बालकलाकारांनी प्रेक्षकांसमोर उभी केली. “चपाती पांड्या” “ताराबाईचा खेळ ” आणि ” गारुडी ” च्या सादरीकरणाने तर टाळ्यांचा,शिट्यांचा कडकडाट करत प्रेक्षकांनी तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास मनमुरादपणे दाद दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना शाहू कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या की लहान विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शाहू ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ दिले जाईल.

यावेळी शाहू कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, कारखान्याचे संचालक सचिन मगदूम, संचालिका सौ सुजाता तोरसकर,कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,कर्नल एम.व्ही.वेस्वीकर, मुख्याध्यापक एस.डी.खोत, पी.बी.मगदुम,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद आदी उपस्थित होते.

सुत्रसंचलन अरूण कांबळे सर यांनी केले तर आभार एस.डी.खोत यांनी मानले.

चौकट

कोरोना काळात काम केलेल्यांप्रती कृतज्ञता….

कोरोनाच्या जिवघेण्या महामारीत पोलीस, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, तरूण वर्ग यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम केले.विद्यार्थ्यांनी या प्रसंगाची मंचावर कविता सादर करताना उपस्थित असलेल्या सर्वांचाच कंठ दाटून आला. अत्यंत भावनाविवश होत विद्यार्थ्यांनी त्यांच्यामुळेच तर आजचे हे सोनेरी दिवस आम्ही पहात आहोत अशा भावना ” तुच देशाची भक्ती….तुच देशाची शक्ती ” या ओळी गुणगुणत कृतज्ञता व्यक्त केली.

🤙 8080365706