
कोल्हापूर: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या, राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा कोल्हापूर मध्ये, न्यू पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष AIML मध्ये शिकत असणारी, कु. प्रत्युषा राहुल नलवडे हिने कोल्हापूर संघाकडून खेळताना रौप्यपदक पटाकवले.

उत्कृष्ट गोल रक्षक असणाऱ्या प्रत्युषा ने भविष्यात भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगले आहे. प्रत्युषाला संस्थेचे चेअरमन के.जी. पाटील सर, न्यू पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ संजय दाभोळे सर, विभागप्रमुख आणि सर्व स्टाफ यांचे प्रोत्साहन लाभले.
