इंटरनेट वापरण्यास समस्या; जिओचं सर्वर डाऊन

मुंबई: संपूर्ण भारतात रिलायन्स जिओचं सर्व्हर डाऊन असल्याने बुधवारी (आज) सकाळी यूजर्सना इंटरनेट वापरण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाऊनडिटेक्टरवर जिओ डाऊन खूप जास्त दाखवत आहे.नेटकऱ्यांनी Downdetector वर तक्रार केली आहे. ट्विटरवर जिओ डाऊनचा टॅगही दिसत आहे. मात्र, नेटकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

DownDetector च्या ग्राफनुसार, सकाळी 09.30 वाजल्यापासून जिओचे सर्व्हर डाऊन आहे. 11 वाजता स्पाईक हाय होता. म्हणजेच इंटरनेट सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. तरीही सुमारे 400 यूजर्सनी डाऊनडिटेक्टरवर तक्रारी नोंदविल्या आहेत. ट्विटरवरही JioDown ट्रेंड करत आहे.

🤙 9921334545