भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. बुद्धिबळ वर्ग, लहान मुलांना सामाजिक आशयाचे पिक्चर, वृक्षारोपण, दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षा व्याख्यानाचे आयोजन, नियमित योग व झुंबा वर्ग, कुंकूमार्चन, अथर्वशिष्य पठण, लहान मुलांसाठी मोफत वाचनालय असे अनेक उपक्रम लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत जरगनगर येथील चिकोडे ग्रंथालयात संपन्न होत असतात. दरवर्षी प्रमाणे यावेळी ही रविवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, जरग नगर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात येत आहे.

यावर्षी 1000 ब्लड बॅग संकलित करण्याचा संकल्प आहे. 25 डिसेंबर रोजी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती ही चिकोडे ग्रंथालयात प्रतिमा पूजनाने होणार आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री नाम. चंद्रकांत पाटील हे उपस्थित असणार आहेत.

याही वर्षी हे शिबीर कोल्हापुरातील उच्चांकी रक्त संकलनाचे वर्ष ठरेल यासाठी सर्व तालीम संस्था, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनाही विनम्र आवाहन भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.यावर्षी 1000 रक्तदान बॉटल्स संकलित करणे हे उद्धिष्ट असून यासाठी शहरातील तालीम संस्था, अनेक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी या रक्तदान शिबीरासाठी उपस्थित असणार आहेत. रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात रक्तदानामुळे गरजूंना रक्ताची उपलब्धता होते यामुळे दिनांक 25 रोजी होणाऱ्या रक्तदान शिबीरास उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.

🤙 8080365706