मायग्रेनचा त्रास होत असेल,डोकं दुखत असेल तर ही बातमी तुमच्याशी

मायग्रेन ही तर डोकेदुखीची एक महत्त्वाची समस्या आहे. डोकेदुखी एकदा सुरू झाली की काय करावे सुधरत नाही. अशावेळी काम सुचत नाही की काहीच सुचत नाही. अशावेळी डोकेदुखी कमी करण्यासाठी बसल्या बसल्या १० मिनीटांत करता येतील असे सोपे उपाय पाहूया.

भुवया दाबा

पहिलं बोट आणि अंगठा अशा चिमटीत धरुन दोन्ही भुवया दाबा. असे ५ वेळा केल्यास दुखणारे डोके थांबण्यास त्याचा चांगला उपयोग होईल. 

कपाळाच्या बाजूला मसाज

डोळ्यांच्या बाजूला कपाळाच्या खालच्या बाजूला पहिल्या २ बोटांनी गोल फिरवून हलका मसाज करा. दोन्ही बाजूने मिळून १० वेळा फिरवा. 

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी हा प्राणायमातील अतिशय उपयुक्त प्रकार असून त्याने आपल्या डोक्याचे बरेचसे स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते. हाताची मधली बोटे कानात घालून ९ वेळा भ्रामरीचा प्रयोग करा. 

🤙 8080365706