जिल्हा नियोजन समिती वरील सदस्यांच्या नियुक्तीला शासनाची मान्यता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक येत्या शनिवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पालकमंत्री दीपक केसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीला आज गुरुवारी शासनाने मान्यता दिली आहे.

या समिती सदस्यांमध्ये खासदार संजय सदाशिवराव मंडलिक, आमदार विनय विलासराव कोरे, प्रतापराव अण्णासाहेब देशमुख, यशवंत केरबा नांदेकर,अशोक काशीनाथ चराटी ,प्रसाद बाळकू खोबरे,भरमु सुबराव पाटील, समरजितसिंह घाटगे माजी आमदार अमल महादेवराव महाडिक, सत्यजित शिवाजीराव कदम ,राहुल बजरंग देसाई, अमित गजानन कामत,अशोकराव कोंडीराम माने,सत्यजीत बाळासाहेब पाटील, शिवाजी सुभाष चौगुले,चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे,दशरथ गणपती काळे,संजय शिवाजीराव पोवार , अंकुश रामचंद्र निपाणीकर,अभयकुमार आप्पासाहेब मगदूम या सदस्यांचा समावेश आहे.

🤙 8080365706