
कोल्हापूर : महात्मा गांधी विद्यालय एन.एम.एम. एस. परीक्षा केंद्रावर घुंगूर (ता. शाहूवाडी) येथील परीक्षार्थी आले. त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली (ता. पन्हाळा) असल्याने त्यांना या केंद्रात परीक्षा देता आली नाही. त्यामुळे १८ विद्यार्थ्यांचे कष्ट वाया जाऊन सारथीची शिष्यवृत्ती हातून गेली. सदर प्रकारास शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार असल्याची तक्रार करत संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.

येथील केंद्रावर बांबवडे, सोनुलें, पिशवी, शित्तुरतर्फे मलकापूर या केंद्रातील विद्याथ्र्यांना परीक्षा देता येते. घुंगुरच्या विद्यालयाने सोईनुसार कोतोली केंद्राची निवड केली. पंधरा दिवसांपूर्वी प्रवेशपत्रिका ऑनलाईन आल्याचे केंद्र संचालकांनी संबंधित मुख्याध्यापकांना कळविले होते. १० वा. २० मि.ची वेळ असताना मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षक १८ परीक्षार्थीना बांबवडे परीक्षा केंद्रावर १० वाजून २५ मिनिटांनी आले. त्यांना कोतोली केंद्रावर जायचे होते. तेथे न जाता चुकीच्या केंद्रावर पाच मिनिटे उशिरा येऊन आले होते. १५ दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रवेशपत्र असतानाही केंद्र मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी व विद्यार्थी यापैकी कोणीच न पाहिल्याने गोंधळ झाला.
माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे सदरचे 18 विद्यार्थी शिष्यवृत्तीस वंचित राहिल्यास मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार असतील याबाबत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी युवराज पाटील बाजीराव सावरे संजय खोत आनंदराव खोत आधी पालक निवेदन देताना उपस्थित होते.
