
कोल्हापूर: विज्ञान प्रदर्शनामुळे किशोरवयीन मुलांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन वाढीस लागेल, यातून नवे संशोधक घडतील असा विश्वास भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. जयंत जोशी यांनी व्यक्त केला.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील नॉलेज कॅम्पस, साळोखेनगर, भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी व भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने डी. वाय. पाटील विद्यानिकेतन येथे दोन दिवसीय विज्ञान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते विज्ञान शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी विद्यापीठाचे डीन अँड रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डी. वाय. पाटील नॉलेज कॅम्पस कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. अभिजित माने, डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या प्राचार्या डॉ. शांती कृष्णमूर्ती, भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी सदस्य व शिबिराचे आयोजक डॉ. जयवंत गुंजकर आणि डॉ. विवेक पारकर व्यासपीठावर उपस्थित होते. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांच्या चिकित्सक वृत्तीस चालना देणे व भारतातील विविध स्तरांतील नावाजलेल्या संशोधकांना एकत्र आणून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरीमध्ये मायक्रोस्कोप फोल्डस्कोप, सभोवतालचे रसायनशात्र, विविध वैज्ञानिक खेळणी, कार्यशाळा, विदुयत घटक, विद्युतचुंबकीय प्रेरण, पौगंडावस्थेतील आरोग्य इ. विषयांवर नावाजलेल्या संशोधकांनी मार्गदर्शन केले. दोन दिवसीय शिबिरामध्ये भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. जयंत जोशी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे रफिक शेख व अवनीश सिंग, कॉन्सप्ट्स अनलिमिटेडच्या सुजाता आग्रे, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. हेमराज यादव, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे डॉ. विजय कुंभार, डॉ. तुकाराम मोरे व डॉ. लीना साळुंखे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या शिबीरीमध्ये विविध शाळेमधील जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याबरोबर विविध वैज्ञानिक प्रयोग व खेळणी बनविण्यासाठीची सामग्री देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगाची निरीक्षणे नोंदवून मार्गदर्शकांबरोबर चर्चा केली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सेन्टर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्च मधील संशोधक विद्यार्थी व डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या कर्मचाऱ्यानी अविरत मेहनत घेतली. या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डीन अँड रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव यांनी विद्यार्थी व आयोजकांचे अभिनंदन केले.
