कॅन्सरसह अनेक आजारांवरील औषधांच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत कमी…

नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. असंसर्गजन्य रोगांपैकी कर्करोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू यामुळं होतो.असंसर्गजन्य रोगांपैकी कर्करोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू यामुळं होतो. त्याच पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कॅन्सरसह अनेक आजारांवर उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत.

याअंतर्गत अत्यावश्यक औषधांच्या यादीत येणाऱ्या 119 औषधांची कमाल किंमत निश्चित करण्यात आलीये. त्यामुळं कर्करोग, ताप, मधुमेह यासह अनेक आजारांचा खर्च 40 टक्क्यांनी कमी झाला आहे.एनपीपीएनं औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. यात रक्तातील यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी वापरलं जाणारं औषध, मलेरियासाठी औषध, तापावरील औषध, पॅरासिटामॉल याचाही समावेश आहे. या औषधांच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.

🤙 8080365706