उन्हाळ्यात कर्नाटकचे पाणी बंद करू; शंभूराज देसाई

नागपूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अरेरावी व उद्दामपणाची आहे. आमचा संयम सुटत आहे. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ. मराठी भाषकांवर अन्याय केला, तर उन्हाळ्यात त्यांना देण्यात येणारे पाणी बंद करू, असा गर्भीत इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिला.

ते म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे चिथावणीखोर आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या चर्चेच्या अनुसरून ते बोलत नाहीत. सीमा भागातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठिशी राज्यातील जनता आहे. एकही इंच जागा न देण्याची भाषा करीत आहे. एक इंच काय आम्ही अर्धा इंचही जागा देणार नाही. त्यांनी अरेरावीची भाषा थांबविली नाही, तर त्याच्या शंभर पटीने आम्हाला बोलता येते, असे देसाई यांनी ठणकावले.

🤙 8080365706