
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार आमदार प्रकाश आवाडे यांनी उच्च न्यायालयामध्ये अतिक्रमण धारकांच्या बाजूने हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. सदरची याचिका मूळ पीआयएलमध्ये उच्च न्यायालयाने समाविष्ट करून घेऊन सुनावणी साठी 19 डिसेंबर 22 रोजी ठेवली होती आज अंतरिम स्थगिती कायम ठेऊन पुढील सुनावणी 24 जानेवारी 23 रोजी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपंनकर दत्ता व न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठसमोर आज सुनावणी झाली अतिक्रमणधारकांच्या जागे संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण धारकांना आपल्या अतिक्रमण निष्काशीत करणे बाबतच्या प्रशासनाने काढलेल्या नोटीसीस उच्च न्यायालयाने 19 पर्यंत स्थगिती दिली होती.
आज शासनाने आपले म्हंनने मांडणे करिता मुदत मागितली,उच्च न्यायालयाने 24 जानेवारी 23 पर्यंत मुदत दिली व अंतरिम स्थगिती 24 जानेवारी 23 पर्यंत कायम ठेवली, या याचिकेवरती पुढील सुनावणी 24 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे अतिक्रमण निष्काशीत काढण्याच्या प्रशासनाच्या नोटिसीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामधे आमदार प्रकाश आवाडे यांच्या बाजूने वकील पटवर्धन व चैतन्य निकते यांनी काम पाहिले.