
कोल्हापूर:कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आलीय.आज नूतन विशेष पोलीस महनिरीक्षक सुनील फुलारी यांनी मनोजकुमार लोहिया यांच्याकडून आपला पदभार स्वीकारला.सद्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झालीय.यावेळी लोहिया यांनी फुलारी याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केल यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.