
मुंबई : “माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून तयार असतातच स्वयंघोषित मावळे” केतकी चितळेच्या नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपल्या सडेतोड प्रतिक्रियेसाठी केतकी ओळखली जाते. तिनं व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेला आणि तिच्या खास सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.काही महिन्यांपूर्वी केतकीनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सोशल मीडियावर तिनं शेयर केलेल्या त्या पोस्टमुळे कार्यकर्त्यांनी केतकीवर नाराजी व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर केतकीवर गुन्हाही दाखल झाला होता. ती काही काळ तुरुंगातही अटक करण्यात आली होती. यासगळ्यात केतकीनं यावेळी देखील आपली भूमिका मांडताना परखडपणा दाखवला होता.आता केतकीच्या दुसऱ्या एका पोस्टनं सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये तिनं पुन्हा एकदा वेगळ्याच विषयाला हात घातला आहे. समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच. या शब्दांत केतकीनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.केतकीनं इंस्टावर शेयर केलेल्या त्या स्टोरीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवातही झाली आहे. आपल्या त्या पोस्टमध्ये ती म्हणते, एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे. मात्र थोड्या वेळानं तिची ती पोस्ट डिलिट केल्याचे दिसून आले आहे.