‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार; छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर : हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं असून हर हर महादेव मध्ये स्त्रियांचा बाजार भरला होता का? असे म्हणत छत्रपती संभाजी राजेंनी चित्रपटाला विरोध केलाय.

इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले.संभाजीराजे  आज बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट झी मराठीवर दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे म्हणाले, नव्या पिढीचं वाचन कमी झालं आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण इतिहासकारांनी हा चित्रपट पाहूच नका असे सांगितले आहे इतक्या चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक आहे. चित्रपटात पाटील हा बलात्कारी दाखवला हे कुठं लिहिलं आहे? स्यियांना सन्मान हे शिवरायांची परंपरा यांनी चित्रपटात स्त्रियांचा बाजार मांडला आहे. शिवरायांचा काळात स्त्रियांचा बाजार भरला होता का? हे इतिहासकारांनी सांगावं. बाजीप्रभूंचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड सुरु आहे.

🤙 8080365706