
मुंबई : कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. ज्ञानोबारायांनी रेडा बोलावला.पण, तू त्या दिवशी गैरहजर होती. तुला जिथं दिसलं तसं फाडून टाकणार आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारे हिचा जाहीर निषेध करते. जिथं दिसालं तिथं ठोकणार, असा इशाराही दिला. ज्ञानोबांवर केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन होतं होती. पण, आता कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी फाडून काढण्याची आणि ठोकण्याचीच भाषा केली. तू जर एखाद्या कीर्तनात बसली असती तर तुला अक्कल आली असती. ज्ञानोबा कोण होते. त्यांच्याविषयी काय बोललं पाहिजे. कीर्तनामध्ये मी बोलू शकते. पण, कीर्तनामध्ये एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही. म्हणून हा व्हिडीओ काढल्याचंही सुनीता अंधारे यांनी सांगितलं.
