महाराष्ट्रात पहिल्यादांच सरपंच पदासाठी लोकसहभागातून निवडणूकीसाठी पैसे गोळा,उचगावात महिला शक्ती निर्णायक ठरणार; प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ

उचगाव – येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रणित उचगाव विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, शौमिका महाडिक व उपस्थित उमेदवार

उचगाव: महाराष्ट्रात पहिल्यांदाच सरपंच पदासाठी लोकसहभागातून निवडणूकीसाठी पैसे गोळा करून देण्यात आले यात भगिनींचाही सहभाग आहे.उचगावात महिला शक्तीच निर्णायक ठरणार असून भाजपा उमेदवार सतिश मर्दाने यांचा विजय निश्चित आहे . असे वक्तव्य भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.

पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मागील सत्ताधार्यांनी का मार्गी लावला नाही असा सवाल ही भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थित केला. उचगाव ता.करवीर येथे मंगेश्वर मंदिर चौकात भाजपा आणि मित्र पक्ष पुरस्कृत उचगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवार प्रचार सभेत बोलत होत्या. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्राताई वाघ म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी महिला, शेतकरी, सर्व सामान्यांसाठी विकासाची दारे खुली केली.उचगावात मूलभूत सुविधा, तसेच त्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मागील सत्ताधाऱ्यांवर होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. महिलांसाठी शौचालय नाही. ही खेदजनक बाब आहे. यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आहे. उचगावच्या विकासासाठी केंद्रातील आणि राज्यातील सरकार कमी पडणार नाही. असे आश्वासन यावेळी वाघ यांनी दिले.शौमिका महाडिक म्हणाल्या, दक्षिण मतदारसंघांतील मोठे गाव असणार्या उचगावची निवडणूक हायहोल्टेज लढत आहे.सरपंच उमेदवार सतिश मर्दाने यांना शेतकरी व भांगलन करणार्या महिलांनी निवडणुकीसाठी पैसे गोळा करून दिले यामुळे भाजपा विजयी निश्चित होईल. मतदारांनी आमिषाला बळी न पडता विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या भाजपाला सत्तेत आणून उचगावच्या सर्वांगीण विकासाला चालना द्या असे आवाहन केले. यावेळी सरपंच पदासाठीच्या निवडणुकीसाठी शेतकरी, महिला व अनेक तरुण मंडळांनी सतिश मर्दाने यांच्याकडे निधी सुपूर्द केला. यावेळी सरपंच पदाचे उमेदवार सतिश मर्दाने, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र संकपाळ, माजी सरपंच अनिल शिंदे, नामदेव वाईंगडे, दत्ता तोरस्कर, भगवान काटे, शहाजी माने , सतिश माळगे, राजेंद्र चौगुले व भाजपा पॅनेलचे सर्व उमेदवार, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706