सातत्य ठेवा;यश नक्की मिळेल : उत्तम फराकटे

कसबा बावडा: डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्नीकमध्ये विद्यार्थ्यांना लाईफ स्किल्स या विषयावर मार्गदर्शन करताना प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उत्तम फराकटे.सोबत प्राचार्य डॉ महादेव नरके, प्रा.बी जी शिंदे, प्रा.सचिन जडगे.

कसबा बावडा/ वार्ताहर : कोणतेही काम करताना त्यात सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल असे प्रतिपादन प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आणि आयर्न मॅन उत्तम फराकटे यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्नीक मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लाईफ स्किल्स या विषयावर मार्गदर्शन केले.

फराकटे पुढे म्हणाले, शिक्षणाबरोबर माणूस म्हणून घडा. आई वडील गुरू बद्दल कृतज्ञ रहा. आयुष्य आनंदाने जगा. मित्र पारखून घ्या कारण चांगल्या संगतीने व्यक्तिमत्व घडते. मिळालेला वारसा पुढे न्या अथवा नवीन गोष्टी घडवा, त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कोणत्याही गोष्टीत सातत्य ठेवा. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करणे महत्वाचे आहे. जीवनात सकारात्मकता ठेवा, अशा शब्दात मौलिक सल्ला त्यांनीदिला.

बुधवार पेठेतील एक युवक ते जागतिक पातळीवरील आयर्न मॅन पुरस्कार प्राप्त ब्रँड कोल्हापूर हा आपला प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी श्री. फराकटे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली. यावेळी प्राचार्य महादेव नरके, प्रा. बी. जी. शिंदे, प्रा. सचिन जडगे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706