वाचल्याशिवाय ज्ञान मिळत नाही; मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : वाचल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. त्यामुळे अधिकाधिक नीट वाचन करा. कळाले नाही तर दोनवेळा वाचा, चिंतन, मनन करा.पण ‘ध’ चा ‘मा’ करू नका असा उपरोधिक सल्ला उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. कोल्हापुरात फिरते वाचनालय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, वाचन संस्कृती वाढण्यासाठी फिरत्या वाचनालयाचा प्रयोग पुण्यात पहिल्यांदा सुरू केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर येथेही हा उपक्रम राबविला जात आहे. आता सुरू केलेल्या फिरत्या वाचनालयात सहा हजार पुस्तके आहेत. शहरातील विविध ठिकाणी थांबून वाचकांना मोफत सेवा देण्यात येणार आहे. ११ जानेवारीपासून शालेय मुलांसाठीही फिरते वाचनालय सुरू करण्यात येईल. शहरातील सर्व रूग्णांसाठी फिरते रूग्णालयही सुरू केले जाईल.

🤙 8080365706