
कोल्हापूर : गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधीची फसवणूक करणार्या ऑक्ट नाईन कंपनीविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अटकेतील संशयित अभिजित जोती नागावकर (वय 35, रा.अयोध्या पार्क) याच्याकडील दोन आलिशान मोटारी पोलिसांनी जप्त केल्या.

गुंतवलेल्या रकमेवर दरमहा 8 टक्के बोनस व 18 महिन्यांनी मूळ रक्कम परत असे आमिष ऑक्ट नाईन इन्व्हेस्टमेंट सोल्यूशन कंपनीने दाखवले होते. कंपनीकडून परतावे देणे बंद झाल्याने तक्रारी दाखल झाल्या. याप्रकरणी अभिजित नागावकरसह.. कृष्णात नंदा चौगले (रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ) व नामदेव विठ्ठल माळी (रा. मणेरमळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.मंगळवारी संशयित नागावकर याला तो राहत असलेल्या इमारतीजवळ आणण्यात आले होते. त्याच्याकडील सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या दोन आलिशान मोटारी जप्त केल्याचे तपासी अधिकारी ईश्वर ओमासे यांनी सांगितले.
