गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ सौंदत्ती येथे रवाना

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळ चे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन गोकुळ चे चेअरमन मा.विश्वास पाटील, यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदत्ती ते रवाना करण्यात आली.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा ४ डिसेंबर २०२२ ते ७डिसेंबर २०२२ इ रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर मधून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. सौंदत्ती येथे,यात्रा काळात पूजाअर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात.

यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होत नव्हते. ते उपलब्ध करणे संबंधी यात्रा कमिटीच्या वतीने गोकुळ चेअरमन मा विश्वास पाटील यांच्याशी चर्चा केली होती.

यात्रेकरूंची सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोकुळ चे चेअरमन विश्वास पाटील सांगितले .यावेळी गोकुळ चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे,संचालक अजित नरके, गोकुळ चे मार्केटिंग अधिकारी हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण ,श्री लक्ष्मण धनवडे ,संघटनेचे प्रशांत मंडलिक श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ,सेवा संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते .

                 


                                                                                                                                      
🤙 9921334545