मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त ववक्तव्यावरून राज्यभर पडसाद उमटत असतानाच भाजप नेते प्रसाद लाड यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाला’, असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
प्रसाद लाड यांचं वक्तव्य’हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली’, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.