या अनोख्या विवाहाची देशभर चर्चा…

लोणावळा: राज्यासह देशात दोन समाजामध्ये तेढ झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील काही भागात दोन समाजामध्ये कटुता वाढल्याची पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, देशात दोन समाजातील दुरावा कमी करणाऱ्या लोणावळ्यामधील अनोख्या विवाहाची चर्चा होत आहे. लोणावळ्यात हिंदू-मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून गुजर आणि शीखलगार या दोन्ही कुटुंबांनी आंतरजातीय विवाह केला आहे.

हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी आहे. या दोघांच्या विवाहाचा विषय देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यासह देशात दोन समाजामध्ये तेढ वाढत असताना दोन्ही कुटुंबाच्या निर्णयाचं कौतुक होत आहे.या विवाहाची विशेष बाब म्हणजे म्हणजे मुलाला आई वडील नाही.

काकानेच पालन पोषण करून लग्न करून दिलं. आम्ही जातीभेद मानत नाही. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करीत असतात ते कुठेतरी थांबायला पाहिजे, असे मत कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केलेशीखलगार हे सांगली जिल्हातीत विटा या गावचे मात्र यांचे बंधु मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. गुजर आणि शीखलगर कुटुंबाला जोडणारी सीमरण आणि नीरज यांनी दोन्ही कुटुंबाला एकत्रित आणले आहे. हा अनोखा विवाह सोहळा लोणावळ्यात पार पडला. मुस्लिम आणि हिंदूमधील दूरावा कमी झाला पाहिजे हा संदेश या विवाहाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

🤙 9921334545