
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद राज्यात पेटलेला असताना याबाबत सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १८ गावांना कर्नाटकात जाण्याची ओढ लागली आहे.

याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.या १८ गावांमधील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या, ३० नोव्हेंबरला या १८ गावातील गावकरी हे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत सर्व गावचे प्रतिनिधी निवेदन देणार आहेत. महाराष्ट्रातील ‘ही’ १८ गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुकसोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, कुमठे, केगांव बु., केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ इत्यादी गावं हे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत.