
मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करणाऱ्या मिंधे सरकारवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली आहे. हा प्रकल्प 100 नाही तर 1000 टक्के महाराष्ट्रात येणार होता, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी हे खोके सरकार खोटे बोलत असल्याचा हल्लाबोल केला.
आदित ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत थेट चर्चेचे आव्हानही दिले.सप्टेंबर महिन्यात ट्विटरद्वारे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचे कळले. हा प्रकल्प 100 टक्के, हमखास महाराष्ट्रात येणार होता.
या प्रकल्पामुळे राज्यात 1 लाख रोजगार निर्माण होणार होते, परंतु ऐनवेळी हा प्रकल्प पलीकडच्या राज्यात गेला. निवडणुकीसाठी असेल पण आपल्यापेक्षा थोड्या कमी विकसीत क्षेत्रात तेव्हा त्या प्रकल्पालाही त्रास होतो. जो प्रकल्प दोन-तीन वर्षात सुरू होऊ शकतो, त्याला सहा सात वर्ष लागतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.