शैक्षणिक सहलीसाठी मुलांचा विमा उतरवणे आणि पालकांची संमती बंधनकारक….

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा- महाविद्यालये नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात शैक्षणिक सहली काढतात. पण, शैक्षणिक सहली काढताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असते. दुसरीकडे, सहलीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची संमती आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांचा विमा उतरवणे ही गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी अनुसरून सहलीतून ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणांना भेटी द्यायला हव्या. सहलीला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट माहिती असावा. गरज पडल्यास त्याला तत्काळ रक्त पुरवठा केला जाईल, असा त्यामागील हेतू असतो. दुर्दैवी घटना घडल्यास त्या मुलाला मदत मिळावी या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधित शाळेचीच असणार आहे. लहान (पहिली ते तिसरीतील विद्यार्थी) मुलांच्या वयानुसार सहलीचे अंतर ठरलेले आहे. लहान मुलांची सहल एका दिवसाची असावी, असा देखील निकष आहे.

शक्यतो शैक्षणिक सहली परिवहन विभागाच्या एसटी बसमधूनच जाव्यात, अशी अपेक्षा असते. खासगी वाहनातून सहली जाताना त्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र आहे का, आरटीओने त्याला एनओसी दिली आहे का, या बाबीदेखील पाहणे बंधनकारक आहे. ठरलेल्या निकषांची पूर्तता करणे शाळांसाठी (मुख्याध्यापक) बंधनकारक आहे.विद्यार्थ्यांचा विमा पण बंधनकारकशाळांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल काढण्यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. सहली ऐतिहासिक व भौगोलिक असाव्यात. खोल समुद्रात, उंच पहाडावर लहान मुलांना नेऊ नये. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची समंती आणि मुलांचा विमा उतरवणे संबंधित शाळेला बंधनकारक आहे.

🤙 9921334545