
आरोग्य टिप्स : आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून आपण घरच्या घरी कोलेस्टेरॉलवर सहज नियंत्रण मिळवू शकता. त्यासाठी ‘आळशी’चा उत्तम वापर करता यायला हवा.
आळशी म्हणजेच फ्लॅक्ससिड्स. आळशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
तयार पावडर एका बॉक्समध्ये ठेवा. ही पावडर आपण रोज रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत प्यावी. याचे सेवन केल्याने शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढेल आणि खराब कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी होईल.”आळशीच्या बिया पौष्टिक तत्वांचा खजिना आहे. त्यांच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक आहेत. शाकाहारी व्यक्तींना फ्लॅक्ससीडमधील ओमेगा ३ खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्लॅक्ससीड उपयुक्त ठरते. यापासून बनलेली पावडर आपण सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता.
