
कोल्हापुर: कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथील सनराइज् हॉस्पिटल समोर असणाऱ्या झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच ते सहा झोपड्या जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत.
आज दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रापंचिक साहित्याच फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि चार पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अखेर अथक प्रयत्नांनी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. मात्र जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालीय.तर आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
