कै. जनाबाई नारायण पाटील (ताई) याचा तेरावा स्‍मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा…

शिरोली दु: शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या तेराव्या स्‍मृतिदिनानिमीत्‍त सोमवारी दि.२८/११/२०२२ इ. रोजी रक्‍तदान शिबीर व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व शालेय सांस्कृतिक कार्यक्रम या विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.

एकनाथ विद्यालयाच्या प्रांगणात फोटोस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. रक्‍तदान हे श्रेष्‍ठदान ही संकल्‍पना घेवून गेली १३ वर्षे रक्‍तदान शिबीर घेणेत येत आहे. यावर्षी शिबीराचे तेरावे वर्ष असून या शिबीरामध्ये विक्रमी ३५१ लोकांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये सौ.सुहासिनी पाटील, सौ.अंकिता गुरव, या दोन महिलांनी रक्तदान केले.

तसेच महिलांनासाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीरामध्ये २५० महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच एकनाथ विद्यालय व शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कूल शिरोली दु. या शाळेच्या विदार्थ्यांचा शालेय सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमावेळी यावेळी माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ,आमदार पी.एन.पाटील, शांतादेवी डी.पाटील,माजी आमदार सुजित मिणचेकर, गोकुळचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक युवराज पाटील(बापू), बाळासो खाडे, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, कर्णसिंह गायकवाड, शशिकांत पाटील–चुयेकर, अजित नरके, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, के.डी.सी बँक संचालक प्रताप माने, माजी जि.प अध्यक्ष राहुल पाटील राजेश पी.पाटील,, माजी संचालक सत्यजित पाटील, किशोर पाटील, राजेद्र मोरे,सचिन पाटील,सुनिल पाटील, राहुल पाटील,नंदकुमार पाटील, अनिल सोलापुरे, माधव पाटील, एस.के.पाटील, व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706