भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी घरगुती उपाय..

आरोग्य टिप्स ; भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी काय करावं याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. .

अनेकदा आपल्याला वजन कमी करायचं असूनही खूप भूक लागते याचं कारण हे आर्टीफिशियल अॅपेटाईट असून नॅचरल अॅपेटाईट नसते. आपल्याला साधारणत: आपण नियमितपणे ज्यावेळी जेवण करतो त्याचवेळी भूक लागते. एरवी भूक लागण्याचे कारण नसते. पण आपल्या शरीरात असे काही हार्मोन्स असतात ज्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. यातील सर्वात महत्त्वाचा हार्मोन आहे ग्रहेलिन, हा हार्मोन आपल्या पोटात तयार होतो आणि तो भूक लागण्यासाठई सगळ्यात महत्त्वाचा असतो

आपल्या जेवणाच्या वेळेला हा हार्मोन तयार होतो, म्हणजेच आपण रोज दुपारी १ वाजता जेवत असू तर साधारणपणे १ वाजताच्या दरम्यान या हार्मोनची निर्मिती व्हायला सुरुवात होते. या हार्मोनचा इफेक्ट केवळ १ तास असतो. अशावेळी तुम्ही पाणी किंवा ग्रीन टी घेतले तर त्याचा परिणाम कमी होतो आणि आपली भूक आपोआप कमी होते. .

भूक लागण्याचे प्रमाण कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आहारात प्रोटीनचा समावेश वाढवणे. प्रोटीनमुळे आपली भूक कमी होते तसेच दिर्घकाळ आपले पोट भरल्यासारखे वाटते. प्रोटीनमुळे ग्रेहलिनची मात्रा नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पर्यायाने आपण वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठू शकतो

🤙 8080365706