
कागल : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे त्यांच्यामध्ये मध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूनेचपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.यामधून विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि हा आत्मविश्वासच त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल असा आशावाद राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केला.

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर कागल येथे आयोजित केलेल्या मोफत पोलीस भरतीपूर्व कार्यशाळेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या,कागल तालुक्यातील गोरगरीब , दिन दलित विद्यार्थ्यांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशानेच राजे फाउंडेशनने ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. याचा पुरेपूर वापर पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन सौ. घाटगे यांनी केले.या कार्यशाळेमध्ये मैदानावरील प्रात्यक्षिकांसह तज्ञांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभले.

या कार्यशाळेमध्ये 139 मुले तर 54 मुलींनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी 100 गुणांची सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अनुक्रमे अरविंद उत्तम पोवार, दिप्तीक विजय पाटील, सुनिल आप्पासाहेब पोवार, राहुल शिवाजी कोरवी,विनायक आनंदा माणगावकर या पहिल्या आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना कागलचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे म्हणाले , तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करून अभ्यासाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश हमखास मिळेल असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके यांनी स्वतःच्या पोलीस भरतीचा अनुभव विद्यार्थ्यां समोर कथन केला. बदलत्या काळानुसार जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे सांगत करीअरच्या द्रृष्टीकोनातुन राजे फाउंडेशनने आयोजित केलेल्या या संधीचं सर्वच विद्यार्थ्यांनी सोनं करावं असे आवाहनही खडके मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात मंझिल अकॅडमी कोल्हापूरचे संचालक अमोल खोत यांनी बदलत्या काळातील स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन परीक्षार्थींना केले.
या कार्यशाळेसाठी कागलचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन मगदूम , राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीचे संचालक चव्हाण सर,माजी क्रिडाशिक्षक मदारे सर, संदीप नेर्ले,अश्विन नाईक, जयसिंगराव घाटगे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.डी.खोत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण यांच्यासह श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलचा शिक्षक स्टाप उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक सौ.एस.बी.सासमिले यांनी केले तर आभार जयश्री पाटील मॅडम यांनी मानले.
