हातापायांना मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष नको..

हातापायांना मुंग्या येणे सामान्य असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता हे अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यामागचे मुख्य कारण असते. एकदा मुंग्या आल्या की हात किंवा पाय इतके बधीर होतात की काय करावे ते समजत नाही. आता ही समस्या दूर करायची तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा तसेच मुंग्या आल्यावर लगेचच काय करावे यासंबंधी माहिती करुन घेणे गरजेचे आहे..

१.ज्यांना सतत हातापायाला मुंग्या येतात त्यांनी आपल्या आहारात मोड आलेली कडधान्ये आणि व्हेज ऑईलचा समावेश करायला हवा. यामध्ये व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.

२. सूर्यफुलाचे तेल आणि राजमा यामध्येही व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात असल्याने आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास मुंग्या येण्याची समस्या कमी होऊ शकते.

३. सुकामेवा विशेषत: बदामामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असल्याने आहारात सुकामेवा आवर्जून घ्यायला हवा. त्यामुळे व्हिटॅमिन ई ची कमतरता दूर होण्यास मदत होते.

🤙 8080365706